फलटण टुडे(बारामती ):
कोर्टातील कामकाज करताना वेळेत व साक्ष पुराव्याच्या आधारे दिलेले न्याय निवाडे त्या व्यक्तीच्या व समाज मनाच्या जीवनावर परिणाम करणारे होऊ शकतात . सत्याची कास धरल्याने न्याय दानाच्या माध्यमातून एक प्रकारे समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे व बारामती कराचा सन्मान दिशा दर्शक व बळ देणारा असल्याचे प्रतिपादन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदी निवड झालेल्या ऍड मोहिनी भागवत यांनी केले.
मळद (दौंड) च्या यशस्वी सरपंच असताना न्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल जळोची ग्रामस्थांच्या वतीने ऍड मोहिनी भागवत यांचा जळोची ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यालयीन अधीक्षक हनुमंत पाटील, मा. नगरसेवक अतुल बालगुडे,भाजपा युवा मोर्चा दौंड अध्यक्ष ऍड बापूराव भागवत,
राष्ट्रवादी युवक राज्य उपाध्यक्ष किशोर मासाळ,रा. स.प अध्यक्ष ऍड अमोल सातकर,व प्रताप पागळे,श्रीरंग जमदाडे,प्रमोद ढवाण ,डॉ नवनाथ मलगुंडे, अजित जमदाडे,प्रो मनोहर जमदाडे,भगवान मलगुंडे,सचिन जमदाडे, नवनाथ जमदाडे, छाया जमदाडे, अर्जुन पागळे,वनीता सातकर, सावता गोरे, निखिल होले, आदित्य जमदाडे ,विजय जमदाडे ,ऍड अश्विनी वाबळे,प्रतीक्षा जमदाडे
आदी मान्यवर व श्रीनाथ म्हसकोबा देवस्थान ट्रस्ट, संत सावतामाळी तरुण मंडळ चे पदाधिकारी उपस्तीत होते.
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर मिळवलेले यश प्रेरणादायी आहे जळोची करांनी केलेला सन्मान जीवनात प्रेरणादायी ठरेल असे मत हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले.
प्रत्येक स्त्री ला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पुरुषांनी खंबीर साथ दिली तर नक्की यश मिळणारच म्हणून सरपंच व न्यायधीश पत्नी होऊ शकली असे ऍड बापूराव भागवत यांनी सांगितले.
या वेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी न्यायदेवतेची प्रतिमा देऊन सन्मानीत करण्यात आले
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील तर आभार प्रदर्शन धनंजय जमदाडे यांनी केले.
: