फलटण तालुका सब ज्युनिअर अँथलेटिक्स चँम्पियनशिप 2023 चे आयोजन

फलटण टुडे (फलटण ) :-
छञपती शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ग्राऊंड , कोल्हापूर या ठिकाणी होणारी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर चँम्पियनशिप 2023 ही दि. 4 व 5 मार्च 2023 रोजी होणार आहे . सदर स्पर्धेसाठी फलटण तालुकास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धा मंगळवार दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.00 वा. मुधोजी महाविद्यालय , फलटणच्या मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेतील निवड झालेले खेळाडू सातारा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविली जाणार आहेत . तरी फलटण तालुकास्तरीय स्पर्धेत जास्तीतजास्त खेळाडू यांनी सहभागी व्हावे असे आवाहन फलटण तालुका अँथलेटिक्स असोसिएशन , फलटण यांच्या वतीने करण्यात येत आहे .
*वयोगट व जन्मतारीख*
▪️ *8 वर्षे मुले – मुली* (05 मार्च 2015 ते 04 मार्च 2017) 
क्रीडा प्रकार- ५० मी. धावणे, ८० मी. धावणे, लांब उडी,
▪️ 10वर्षे मुले – मुली* ( 05 मार्च 2013 ते 04 मार्च 2015) 
क्रीडा प्रकार- ५० मी. धावणे, ८० मी. धावणे, लांब उडी,
▪️ 12 वर्षे मुले – मुली* (05 मार्च 2011 ते 04 मार्च 2013)
क्रीडा प्रकार-६० मी. धावणे, २०० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक,
अधिक माहितीसाठी संपर्क श्री. नामदेव मोरे, सचिव , फलटण तालुका अँथलेटिक्स संघटना 
मोब.9960082120 ,श्री .जर्नादन पवारउपाध्यक्ष , फलटण तालुका अँथलेटिक्स संघटना  मोब.9970828950
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!