फलटण टुडे (सातारा दि. 10 ) :
साखर कारखान्यात येणारे ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड म्हणून काम करीत असतील त्यांना ग्रामसेवकांनी संबंधित गावातील, वस्त्यांमधील, तांड्यामधील, पाड्यांमधील व इतर यांना ओळखपत्र देण्यात यावीत अशा सूचना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.
बैठकीमध्ये साखर कारखान्यात येणारे ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्यात यावे. तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास त्याचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सूचनाही श्री. जयवंशी यांनी दिल्या.
बैठकीला सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते.