फलटण टुडे (बारामती ):
पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयाचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला.या स्पर्धेत विद्यार्थांनी सोशल मीडियाचा जागर या विषयावर नाटिका सादर केली.या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठी टेक्निकल च्या कु.वैष्णवी कुंभार व कु.यशोधरा खरात यांना सन्मानित करण्यात आले.या नाटिकेसाठी विद्यालयातील उपशिक्षिका सौ.ऊर्मिला भोसले यांनी मार्गदर्शन केले.पुणे येथे झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे व आयुक्त आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक च्या शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य पोपट मोरे,उपमुख्याध्यापक कल्याण देवडे,पर्यवेक्षक निवास सणस ,अर्जुन मलगुंडे तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सदाशिव सातव यांनी सहभागी विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन केले.