प्रा. नितीन नाळे यांचा सन्मान करताना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , आमदार दिपकराव चव्हाण श्रीमंत माजी पंचायत समिती सभापती शिवरूपराजे खर्डेकर व इतर मान्यवर
फलटण टुडे ( वाठार निंबाळकर ) : –
वाठार निंबाळकर येथे 5 फेब्रुवारी 2023 ला विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण , माजी पंचायत समिती सभापती शिवरूपराजे खरडेकर फलटण तालुका दूध संघाचे विद्यमान चेअरमन धनंजय पवार साहेब महानंदाचे संचालक डी के पवारांना तसेच फलटण तालुक्याचे माजी उपसभापती विवेक शिंदे महाराष्ट्र केसरी पैलवान गोरक्षक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये वाठार निंबाळकर नगरीचे सुपुत्र प्राध्यापक नितीन महादेव नाळे यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक साहित्य प्रबोधन काव्य संमेलन या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला आजपर्यंत प्राध्यापक नितीन नाळे यांनी 1297 पेक्षा जास्त व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रभर दिलेली आहेत तसेच ते सध्या सातारा जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* कार्यरत आहेत त्यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने ही सन्मानित केले आहे याच कार्याची दखल घेऊन समस्त वाठार निंबाळकर वाशी यांच्या वतीने म्हणजेच माय भूमीच्या वतीने त्यांचा झालेला हा जाहीर सत्कार त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं या सत्काराच्या वेळेला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री नंदकुमार नाळे गावच्या नूतन लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा नंदकुमार नाळे तसेच उपसरपंच नेताजी निंबाळकर सर्व सदस्य , सौ रूपाली नाळे,तसेच गावचे आजी-माजी सरपंच माझे सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य व कुटुंब व मित्रपरिवार , हजारो ग्रामस्थ उपलब्ध होते