इयत्ता सहावीच्या विद्यार्थांनी घेतला पुस्तक सारांश लेखनाचा अनुभव
फलटण टुडे (फलटण) दि ०७ :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे मराठी भाषा संवर्धन सप्ताहास शनिवार दिनांक ०४ फ्रेब्रुवारी २०२३ रोजी या उपक्रमास सुरवत करण्यात आली .
या कार्यक्रमास इयत्ता सहावीतील ६५० विद्यार्थानी सहभाग नोंदवला त्यांना मुधोजी हायस्कूल मधील ग्रंथालयातील प्रत्येकास एक पुस्तक देण्यात आले व विद्यार्थांना त्या पुस्तकांमधील आवडलेल्या भागावर थोडक्यात माहिती लिहायला सांगितली . या उपक्रमस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .
यामध्ये उपक्रमामध्ये सर्वात चांगल्या मराठी लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस देण्याची योजना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांच्या मध्यमातून राबविण्यात आली आहे .
यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य बाबासाहेब गंगवणे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे उपस्थित होते . मुधोजी हायस्कूल ग्रंथालयाच्या व मराठी विभागाच्य संयुक्त विध्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे . मुधोजी हायस्कूल ग्रंथालय प्रमुख ए. बडवे व मराठी विभागाच्या प्रमुख एल एच अनपट यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला
यावेळी बोलताना मराठी भाषा विभाग प्रमुख एल एच अनपट या म्हणल्या की मराठी भाषा संवर्धन मुळे विद्यार्थ्यांना म्हणी, सुविचार , वाक्प्रचार इत्यादमध्ये सुधारणा होते आणि लेखन कौशल्य वाढते तसेच हा मराठी भाषा संवर्धन उपक्रमाचे फायदे व कशासाठी हा मराठी भाषा पंधरवडा राबवीला जातो हे विद्यार्थांना सोगिले
त्यानंतर ग्रंथपाल सौ ए बडवे यांनी मराठी भाषा दिन साजरा करण्याचा हेतू सांगताना कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे सांगितले तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचे नाव आकाशगंगा मधील एक ताऱ्याला दिले गेले आहे . ध्रुव ताऱ्यासारखे असं साहित्य निर्माण करणारे कवी कुसुमाग्रज होते . तसेच नवीन पिढी ने सुध्दा एम पी एस सी परीक्षा देताना सुध्दा मराठी भाषा त्यातील व्याकरण यांचा उपयोग होतो त्यासाठी मराठी भाषा संवर्धन ची गरज आहे ज्ञानेश्वरांनी भगवद् – गिता ही मुळ संस्कृत भाषेत असल्याने सामान्य लोकांना समजण्यास अवघड होती म्हणून ती सोप्या भाषेत सर्वांना समजावी म्हणून ज्ञानेश्वरांनी ती मराठी भाषेत लिहिली असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर इयत्ता सहावी घ्या सर्व विद्यार्थ्यांना अवांतर वाचन चे महत्व सांगून पुस्तके देण्यात आली .
या कार्यक्रमाला या प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , स्टाफ सेक्रेटरी लतिका अनपट , एस एस सस्ते , घोरपडे एस डी , नाईक निंबाळकर ए ए, रसाळ एस एस, नाईक निंबाळकर पी . एस , बुचडे एल यु, घोलप एस एस, टि व्ही.शिंदे , कदम एस बी , अहिवळे एस , स्टाफ सेक्रेटरी नितीन जगताप , डी.एन.जाधव, रामदास माळवे , अमोल नाळे , अमोल सपाटे , तडवी एस यांनी या उपक्रमास सहकार्य केले .