**
फलटण टुडे (फलटण :
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरात पंचायत/तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत देशभक्तीपर गीतलेखन, रांगोळी काढणे आणि अंगाई गीत लेखनासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून केली होती आणि सोशल मीडियावर मान्यवर व्यक्तींनी सादर केलेल्या प्रस्तुतिकरणाने या उपक्रमाच्या लोकसहभागासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2021 या राष्ट्रीय एकता दिनापासून या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली होती. या कार्यक्रम अंतर्गत अंगाई गीत लेखन स्पर्धेसाठी कृषि महाविद्यालय, फलटण येथील चतुर्थ वर्षातील कुमार आदेश विजयसिंह वाघ या विद्यार्थ्याने सहभाग घेवुन राष्ट्रप्रेमपर आधारित अंगाई लेखन सादर करून राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविला. सदरील स्पर्धेच्या पारितोषिकाचे स्वरूप राज्यस्तरावर एक लाख रुपये व जिल्हास्तरावर दहा हजार रुपये असे आहे. सदरील अंगाई लेखन स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. प्रल्हाद भोसले, श्री. विक्रमसिंह साबळे, प्रा. रश्मी नाईकवडी यांचे मार्गदर्शन लाभले.
अंगाई लेखन स्पर्धेतून कृषि महाविद्यालय, फलटण येथील कुमार आदेश वाघ या विद्यार्थ्याने राज्य तसेच जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक पटकाविल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी विद्यार्थ्याचे, सांस्कृतिक विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. प्रल्हाद भोसले, श्री. विक्रमसिंह साबळे, प्रा.रश्मी नाईकवडी यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.