फलटण टुडे (फलटण) :
केंद्र सरकारच्या क्रीडा विभागा मार्फत “पाचव्या खेलो इंडिया गेम्स मध्य प्रदेश 2022” अंतर्गत मध्य प्रदेश भोपाळ येथे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमधील कानोईग अँड कयाकिंग या खेळ प्रकारासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर मुकुल महेश खुटाळे यांची माननीय आयुक्त, क्रीडा व युवकसेवा संचलनालय पुणे यांनी फिजिओथेरपिस्ट पदी नियुक्ती केलेली आहे.
डॉक्टर मुकुल खुटाळे यांनी यापूर्वी हॉकी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहिलेले असून भारतीय खो खो संघाच्या फिजिओथेरपीस्ट पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.
डॉक्टर मुकुल खुटाळे यांची महाराष्ट्र संघाच्या फिजीओथेरपीस्ट पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सभापती माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, माननीय आमदार श्री दीपकराव चव्हाण साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब, महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब व विविध स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.