श्रीमंत रामराजे अमृत महोत्सव चषकचा मानकरी ठरला यश कन्स्ट्रक्शन, फलटण संघ

फलटण:- सन 2023 च्या श्रीमंत रामराजे अमृत महोत्सव चषकचा मानकरी ठरला  यश कन्स्ट्रक्शन फलटण संघ
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती तथा विधान परिषद विद्यमान सदस्य मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य अशा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

श्रीमंत रामराजे अमृत महोत्सव चषक 2023 भव्य फुलपीच  टेनिस बॉल क्रिकेट  स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुलन क्रिकेट टीम व आर एस पी वॉरियर्स क्रिकेट क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 दरम्यान वाठार निंबळकर येथे करण्यात आले होते
या स्पर्धेमध्ये  फलटण तालुका  
,खटाव ,सातारा इंदापूर, इंदापूर, अकलूज, माण इत्यादी ठिकानाऊन संघ सहभागी झाले होते . या संघाचे
गाव वाईजच व तालुका वाईज तसेच नगरपालिका वाईज असे गट तयार करून स्पर्धा खेळवीण्यात आल्या .
सदर स्पर्धेचे उद्घाटन 25 जानेवारी रोजी फलटण – कोरेगाव विधानसभेचे  आमदार मा. दीपक चव्हाण  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धा पाच दिवस चालल्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यु ट्युब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आले . तसेच या स्पर्धा अंतरराष्ट्रीय नियमांनुसार खेळविण्यात आल्या यामध्ये रिव्ह्युव सिस्टिम सुध्दा घेता येत होती . तसेच हिंदी , मराठी व इंग्लिश मधून या सामन्यांचे समालोचन उत्कृष्टपणे केले गेले .
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यश कन्स्ट्रक्शन , फलटण या संघाने पटकावला त्यांना 51000 / – रोख व चषक देण्यात आला तर द्वितीय क्रमांक सांगवी मायनर फलटण संघाने पटकावला त्यांना 25000 / – रोख व चषक देण्यात आला  व तृतीय क्रमांक एस पी बारामती या संघाला मिळाला त्यांना 15000 / – रोख व चषक देण्यात आला आणि चतुर्थ क्रमांक तांदुळवाडी (बारामती ) या संघानी पटकवला या संघास 11000 / – रोख व चषक देण्यात आला .
या स्पर्धेमधे अनेक वैयक्तिक बक्षीचा वर्षाव  करण्यात आला यामध्ये ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चे रणजीत निंबाळकर यांच्या कडून मॅन ऑफ द सिरीज साठी  सायकल बक्षीस देण्यात आली. 
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समरंभ 29 जानेवारी रोजी पार पडला या समारंभाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र ॲमेच्युअर खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतारा , मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) होते यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले,  यावेळी प्रमुख उपस्थिती मधे महाराजा उद्योग समुहाचे रणजितसिंह दिलीपसिंह भोसले , युवा उद्योजक अमित अशोक भोईटे, युवा उद्योजक तुषार (भैय्या ) नाईक निंबाळकर ,  जगन्नाथ (भाऊ) कापसे   युवा उद्योजक अमरसिंह  देशमुख , जितेंद्र कुमार निंबाळकर (काका) ,
औदुंबर निंबाळकर , युवा उद्योजक योगेश महादेव शिंदे , सुरेश धायगुडे ,
अभिजीत निंबाळकर ,अजिंक्य (बंटी ) गायकवाड ,विशाल तेली, ए व्ही ज्वेलर्स चे मालक व इतर मान्यवर उपस्थित होते .
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी
राहुल लंभाते ,प्रणव मंत्री, अक्षय साळुंखे ,स्वप्निल शिंदे ,महादेव शिंदे धर्मराज शिंदे ,बापू भोजने ,रामा ढेंबरे, समीर मणेर, आली मणेर, संदेश जाधव केदार साळुंखे,बापू गायकवाड सर ,सुनील पाडवी , गुळदगड फौजी, शैलेश पवार, प्रशांत वाडेकर , अवि कांबळे, बंटी पुजारी, रणजित  निंबाळकर , बंटी लाळगे, या सर्वानी विशेष परिश्रम घेतले व स्पर्धा यशस्वी पार पाडल्या
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!