फलटण टुडे (बारामती ):
पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामसेवक सहकारी पतसंस्था स्थापनेपासून पहिल्यांदाच अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे सर्व संचालक प्रचंड बहुमताने निवडून आले .
शनिवार दिनांक 28 /1/ 2023 रोजी श्रीमती एच.ए.पाटील सहाय्यक सहकार अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या
प्रथम सभेमध्ये बारामतीचे श्री.महेंद्र दामू बेंगारे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्याचबरोबर
सौ.छाया साकोरे -शिरूर व्हाईस चेअरमन,
श्री देवदत्त सांडभोर -आंबेगाव सेक्रेटरी,
श्री तुकाराम शिंदे -इंदापुर खजिनदार
यांची बिनविरोध निवड करणेत आली.
पतसंस्थेचे भाग भांडवल 20 कोटी रुपये आहे. दरवर्षी सात टक्के डिव्हिडंड वाटप केला जातो. सभासदांना ८ टक्के व्याजदराने दहा लाख रुपये कर्ज वाटप केले जाते.
यावेळी प्रमुख पॅनल प्रमुखांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना श्री महेंद्र बेंगारे म्हणाले की ,जेष्ठांचे मार्गदर्शनाखाली व सर्व संचालकाच्या सहकार्याने कर्ज मर्यादा टप्प्याटप्प्याने 15 लाखापर्यंत करून व्याजदर तोच ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. संस्थेसाठी सर्वांना सोयीस्कर जागा पाहून इमारत बांधण्याचे काम मार्गी लावण्यात येईल. सर्व सभासदांना भरणा झाला की चटकन मेसेज सिस्टीम राबवून संस्थेचा कारभार पारदर्शक व संपूर्ण संगणकीय केला जाईल.संस्थेचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने सभासदांच्या ठेवी स्वीकारून त्यांना व्याजदरही चांगला दिला जाईल. सभासदांचे मुलीच्या विवाहप्रसंगी कन्यादान योजना अमलात आणण्याचा विचार असून, सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव दरवर्षी केला जाणार आहे.
आजच्या निवड प्रक्रियेला पॅनल प्रमुख महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन घटना दुरुस्ती समितीचे अध्यक्ष श्री अनिल कुंभार, कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संघटक तथा पुणे जिल्हा अध्यक्ष श्री श्रीकांत वाव्हळ, सरचिटणीस श्री अनिल बगाटे, मा. पुणे विभागीय उपाध्यक्ष व विध्यमान संचालक श्री अमोल जी घोळवे ,मानद जिल्हाध्यक्ष श्री मच्छिंद्र आटोळे,बाळासाहेब गावडे, उपाध्यक्ष श्री निलेश पांडे, श्री प्रवीण खराडे, कार्याध्यक्ष श्री संदीप ठवाळ, कोषाध्यक्ष श्री संतोष भोसले, जिल्हा महिला उपाध्यक्ष श्रीम सुप्रिया सांडभोर, महिला संघटक श्रीम अस्मिता चव्हाण, कृषी तांत्रिक संघटना चे राज्य कार्याध्यक्ष श्री नवनाथ झोळ, श्री भीमराव भागवत, मावळते चेअरमन श्री शंकर ढोरे, श्री कैलास कारंडे,बाळासाहेब मतकर, शरद ढोले,वीरेंद्र गवारी ,दुराफे, प्रसाद सोले,निलेश लवटे, सचिन पवार,पी टी पवार,सतीश बोरावके प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक म्हस्के, तसेच पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन चे आजी माजी पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष / सचिव सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, व सभासद बंधू भगिनी उपस्थित होते .