ज्ञानसागरच्या चौदा विद्यार्थ्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित

**

ज्ञानसागर चे यशस्वी विद्यार्थी
फलटण टुडे (बारामती )::
 महाराष्ट्र राज्य शासनाच्या भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेतर्फे सन २०२२-२३ या वर्षात राज्य स्तरावर राज्य पुरस्कार परिक्षा* शिबिराचे दि. 22 जानेवारी ते 25 जानेवरी या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र, रामबाग,(भोर) जि. पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. सदर परिक्षेत पुणे , सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यांमधून एकुण 374 विद्यार्थी यशस्वी झाले.

यातील बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सावळ या शाळेतील एकुण 14 विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य पुरस्कार* प्राप्त केला. यामध्ये दिव्या विकास आटोळे, आदिती बाबुराव चव्हाण, सिध्दी पिंटु चव्हाण,वैष्णवी सर्जेराव चव्हाण,प्राची नितीन ठोंबरे, सानिका धनाजी झारगड, वैष्णवी नितीन शिंदे,यश सुरेंद्र निगडे, अविष्कार शहाजी देवकर,कार्तिक पुरुषोत्तम निंबाळकर,आदेश हरिभाऊ मासाळ,विनय कांतीलाल आटोळे,प्रेमजीत दशरथ सायकर, दिशांत नवनाथ शेलार या सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांला सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देउन सन्मानीत करण्यात आले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे ,सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे,नीलिमा देवकाते ,राधा नाळे,स्वपनाली दिवेकर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक वर्ग यांनी केले.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!