फलटण टुडे ( सातारा ) दि. 30 :
महसूल व वन विभागाकडून जाहिर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन 2018 व 2019 चे वितरण प्रजासत्ताक दिनी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे आदी उपस्थित होते.
िसन 2018 या वर्षाकरिता सातारा कार्यक्षेत्रात विभागीय स्तरावरील शैक्षणिक संवर्गाकरिता श्री. शिवाजी विद्यालय, सुरुर ता. वाई तर ग्रामपंचायत संवर्गाकरिता ग्रामपंचायत बिदाल ता. माण यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्यक्ती संवर्गाकरिता रोहित शंकर बनसोडे मु. पो. गोंदवले खुर्द, ता. माण यांना द्वितीय क्रमांकाचे तर पोलीस अधिक्षक कार्यालय सातारा यांना विभागीय स्तरावरील ग्राम/जिल्हा/विभाग संवर्गाकरिता पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच सन 2019 या वर्षाकरिता विभागीय स्तरावरील शैक्षणिक संस्था संवर्गाकरिता मुधोजी विद्यालय, फलटण व ग्रामपंचायत संवर्गाकरिता ग्रामपंचायत गमेवाडी, ता. कराड यांना प्रथम तर स्व. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे ता. कराड यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
0