फलटण टुडे (सातारा ) दि. 30:
ओबीसी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती जेईई, निट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटपाची योजना राबवित आहे. याकारिता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात टॅब वाटप करण्याकरिता समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब मिळेल याची दक्षता घेण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांनी कळविले आहे.