माझी वसुंधरा अभियान 30/ 2023 फलटण नगर परिषद फलटण यांच्या अंतर्गत माझी वसुंधरा अभियानामध्ये फलटण नगरपरिषद मध्ये सहभाग नोंदविला आहे त्याच अनुषंगाने मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत जनजागृती संदर्भ वृक्षदिंडी माध्यमातून एक अनोखी जनजागृती करून नागरिकांनी आपली वसुंधरा, स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी वृक्षदिंडीच्या माध्यमातून माझी वसुंधरा शपथ घेऊन नागरिकांना वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी शपथ घेण्यात आले. मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर ते नगरपरिषद कार्यालया समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फुगडी, नृत्य, विविध घोषणा देत वृक्षदिंडी काढून फलटणकरांना वेगळा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. फलटण नगरपरिषद फलटण अंतर्गत यावेळी नगर परिषदेचे आरोग्य विभाग, नगर अभियंता, कार्यालयीन निरीक्षक, नोडल अधिकारी व इतर अधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर ,शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते.