जिजाऊ भवन मध्ये पैठणी साडीची अनोखी रांगोळी जिजाऊ सेवा संघाचा उपक्रम

फुलांची सजावट व साडेपाच मीटर रांगोळी सहित उपस्तीत महिला


फलटण टुडे (बारामती ): 
शिवजन्म सोहळा फुलांची सजावट व साडेपाच मीटर पैठणी साडीची अनोखी रांगोळी काढून हळद कुंकु चा कार्यक्रम संपन्न करत जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी नावीन्य पूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला.
बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा व हक्काचे व्यासपीठ निर्माण होणे साठी हळद कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून ‘ कलाविष्कार ‘ या कार्यक्रमा चे आयोजन केले होते . 
अध्यक्षा हेमलता परकाळे, उपाध्यक्षा स्वाती ढवाण, कार्याध्यक्षा सुनंदा जगताप, उपकार्यध्यक्षा प्रतिभा बर्गे, सचिव ज्योती खलाटे, सहसचिव सारिका परकाळे, खजिनदार संगीता शिरोळे, सहखजिनदार अर्चना परकाळे,सौ केसकर,सौ खेडकर ,सौ माने सौ जगताप व इतर सर्व क्रियाशील सदस्या यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जानेवरी महिन्यातील कलाविष्कार म्हणून जिजाऊ सेवा संघाच्या सह खजिनदार अर्चना परकाळे यांनी सदर रांगोळी काढली या मध्ये झेंडू ची फुले १५ किलो, गुलछडी ५ किलो, मोगरा १० किलो, व जास्वंद,सोनचाफा आदी फुलांचा व इतर साहित्य शिवजन्म सोहळा सजावट साठी वापरले तर पैठणी साडीची रांगोळी साठी विविध प्रकारच्या व रंगाची रांगोळी व इतर साहित्य वापरण्यात आले. उत्तम चित्रकला ,आखीव व रेखीव मापे या च्या आधारावर रांगोळीत जिवंतपणा आणू शकतो व रांगोळी सांस्कृतिक व मांगल्याचे प्रतीक असल्याचे अर्चना परकाळे यांनी सांगितले.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!