कोल्हापूर ऑलम्पिक मध्ये ओम प्रथम २ तास २० मिनिटात स्पर्धा पूर्ण

खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते प्रथम क्रमांका ची ट्रॉपी स्वीकारताना सायकल सहित ओम सावळेपाटील 
 (छाया: महालक्ष्मी फोटो कोल्हापूर)
 
फलटण टुडे (बारामती ): 
  रविवार ३० जानेवरी रोजी कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्ट्स क्लब च्या वतीने आयोजित कोल्हापूर ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये बारामती सायकल क्लब चा खेळाडू ओम सावळेपाटील याने 
प्रथम क्रमांक मिळवत १५०० मीटर्स स्विमिंग, ४०किमी सायकलिंग, १० किमी रनिंग केवळ ०२ तास २० मिनिटात पूर्ण केले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू व सैन्यदल, पोलीस दल आदी क्षेत्रातील एक हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला
 ओमने प्रथम क्रमांक नंबर मिळवित, स्वतःच्या वेळेचा (Personal Best) एक विक्रम केला.
कोल्हापूर चे खासदार संजय मंडलिक ,डेक्कन स्पोर्ट्स क्लब चे स्पर्धा आयोजक वैभव बेळगावकर, अध्यक्ष उदय पाटील, माजी महापौर महेश कदम, इचलकरंजी चे माजी नगराध्यक्ष दादासो जांभळे व कोल्हापूर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बक्षिस समारंभ करण्यात आला.
सदर स्पर्धे मधील यशा मुळे आत्मविश्वास वाढल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन व ट्रायथलॉन साठी सहभागी होणार असल्याचे बक्षिस समारंभात ओम सावळेपाटील यांनी सांगितले 


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!