रुई च्या कार्यकर्त्यांचे कार्य आदर्शवत : सुप्रिया सुळे

 

खा. सुळे यांचा सत्कार करताना प्रा. अजिनाथ चौधर, रंजना चौधर, सुरेखा चौधर व पांडुरंग चौधर

फलटण टुडे (बारामती ): –
सत्ता असताना शासनाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहचविणे व जनतेची कामे करणे व सत्ता नसताना सुद्धा त्याच जोमाने जनतेची कामे उत्साहात करणे हे केवळ कार्यकर्त्या मुळे शक्य होते त्यामुळे कार्यकर्त्यांची ताकद हीच राष्ट्रवादीची ओळख असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
रुई मध्ये प्रा अजिनाथ चौधर व मा. नगरसेविका सुरेखा चौधर व कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
या प्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव ,मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,मा. उपनगराध्यक्ष बाळासो जाधव, शहर अध्यक्ष जय पाटील, तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,युवक अध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे व रुई चे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर,बाबासो चौधर, राहुल राहुल सोनने,नवनाथ चौधर, सुशील घाडगे,अतुल कांबळे, रोहित कांबळे, विठ्ठल चौधर,सूरज चौधर, पोपट साळुंके आदी मान्यवर व रुई मधील नागरिक उपस्तीत होते.
सेवानिवृत्ती नंतर रुई मधील विविध उपक्रमा राबविणे व समाजसेवा चे व्रत स्वीकारणे हे प्रा. अजिनाथ चौधर यांचे कार्य व मा नगरसेविका सुरेखा चौधर यांनी रुई मध्ये केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
शैक्षणिक, धार्मिक,अध्यात्मिक कार्य व विध्यार्थी,ज्येष्ठ,महिला आदी साठी विविध उपक्रम राबविताना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून उत्तम व बळकट संघटन करून नगरपरिषद, लोकसभा विधान सभा साठी उच्चाकी मताधिक्य राष्ट्रवादी च्या उमेदवारास देणार असल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रा अजिनाथ चौधर व सुरेखा चौधर यांच्या कार्याच्या पुस्तकाचे प्रकाशन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्तितांचे स्वागत पांडुरंग चौधर,सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार मच्छिंद्र चौधर यांनी मानले 



——————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!