फलटण टुडे (फलटण) दि 27 :
मुधोजी महाविद्यालयात 26 जानेवारी 2023 रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पाहुण्यांच्या आगमनानंतर मुख्य अतिथी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी व प्र.प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम यांच्याकडून एन.सी.सी छात्रांचे परेड निरीक्षण करण्यात आले. यावेळी एन.सी.सी छात्रांचे मोठ्या उत्साहात परेड संचलन झाले.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत केले तसेच प्राचार्य यांचे स्वागत वरीष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.संजय दिक्षित यांनी केले . तसेच कॅप्टन धुमाळ एस. के व कॅप्टन शिंदे एल. एस यांनी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक तसेच महाविद्यालयाच्या सी.डी.सी. सदस्यांचे स्वागत केले.
यावेळी एन.सी.सी कॅडेटच्या पारितोषिक वितरणामध्ये नॅशनल कॅम्प ला गेलेले , कॅप मध्ये बक्षीस मिळवलेले , आर्मी मध्ये ट्रेनिंगला गेलेले, आर्मी मध्ये भरती झालेले ( अग्नीवीर ) , विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले कॅडेट्सचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
उपस्थित यांचे आभार मानून झाल्यानंतर एन.सी.सी गान झाले त्यानंतर एन.सी.सी गर्ल्स छात्रांनी काढलेल्या फ्लॅग एरिया चे उदघाटन, युवादर्पण व भित्तिपत्रक प्रकाशन समारंभ यांचे उदघाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने , ‘ जगन्नाथ (भाऊ) कापसे , पालक , सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका , शिक्षकेत्तर कर्मचारी , एन.सी.सी कॅडेटस्, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन कु. शिंदे एल. एस. व कॅप्टन धुमाळ एस. के. यांनी केले व आभार ननावरे एस. एस. यांनी मानले.