**
फलटण टुडे (सातारा ), दि. २६ :-
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाची कार्यकारिणी दरवर्षी निवडण्यात येते. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सातारा जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्षपदी पक्षर्शेष्ठींनी केलेली फेरनिवड आपण सार्थ ठरवणार आहोत. सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र पत्रकार संघ बांधणीसाठी चांगल्याप्रकारे आपण प्रयत्न करणार असून सर्वांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल तसेच सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील तालुका स्तरावरील निवडी लवकरच जाहीर करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे यांनी सांगितले.