भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा लढा, स्वातंत्र्यसैनिक क्रांतीकारक यांचा त्याग बलिदान यांचा इतिहास मुलांना शिकवावा असे आवाहन जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्रीमती शारदादेवी कदम यांनी गिरवी ता फलटण जि सातारा येथील भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन मार्गदर्शन करताना केले.
या कार्यक्रमाला गिरवी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वैशाली कदम, उपसरपंच संतोष मदने, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कदम,गिरवी केंदसमुहाचे केंद्रप्रमुख अनिल कदम,गिरवी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शारदादेवी कदम पुढे म्हणाल्या की, शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त, स्वच्छता, आहार, व्यायाम, प्राणायाम व आरोग्य विषयक मूलभूत माहिती व महत्व याबाबत शिक्षणात प्राधान्य द्यावे.अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा गिरवी मधील विद्यार्थी राज्य स्तरावर निवड होऊन पाच हजार रुपये रोख बक्षीस व सत्कार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते करण्यात आला हि बाब अभिनंदनीय कौतुकास्पद आहे.शाळामधील विद्यार्थ्यांना वाचनाची सवय आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय व वाचनालयाचा पुर्ण क्षमतेने वापर करावा.ग्रामीण भागातील गोरगरीब समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी निपुण भारत अंतर्गत शिक्षकांनी संवेदनशीलपणे शैक्षणिक कामकाज करावे.
यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड, मानवंदना, लेझिम पथकांची प्रात्यक्षिके, देशभक्तीपर गीते, नृत्य, गायन, वादन, संगीत महोत्सवाचा बहारदार कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला.
याप्रसंगी प्रास्ताविक प्रा संजय सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र वाघ यांनी केले सुत्रसंचलन अजय कदम यांनी केले.
यावेळी प्रकाश कदम, संभाजी कदम, यशवंत कदम, अभिजित कदम, सादिक मणेर, राजेन्द्र कदम, अधिकारी व पदाधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते