**
फलटण टुडे ( फलटण )दि.25 : –
शून्यातून विश्व घडविण्याची प्रेरणा शिवचरीत्रातुन मिळते त्यामुळे युवकांनी शिवचरित्राचे वाचन करून जीवनात गरुड झेप घेतली पाहिजे कारण हे शिकवणारे फक्त एकच विद्यापीठ होते आणि ते म्हणजे शिवाजी राजे असे प्रतिपादन आपल्या व्याख्यानात प्रा. दिलीप शिंदे यांनी व्यक्त केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 22 जानेवारी पासुन जावली ता. फलटण येथे सुरू आहे . प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी “युवकांनी शिवचरित्रातून काय शिकावे” या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते म्हणून पुष्पगुंफताना प्रा. दिलीप शिंदे बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक होते.
यावेळी प्रा. शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून इतिहासातील वेगवेगळी उदाहरणे देत ते प्रसंग सर्वांच्या नजरेसमोर उभे केले.त्या मधून युवकांनी काय शिकावे हे सांगतांना स्वराज्याचा मावळा शिवा काशिद यांच्याकडून निष्ठा शिकली पाहिजे व जीवनातील प्रत्येक काम हे निष्ठेने केले पाहिजे, हिरोजी इंदलकर यांच्याकडून पवित्र सेवा कशी असावी हे शिकले पाहिजे, तसेच पुरंदर चा तह व आगय्रातून सुटका या प्रसंगातून जीवनात कितीही संकटे ,अपयश आले तरी कधीही हार न मानता त्यावर यशस्वी मात केली पाहिजे तसेच आयुष्यात जमेल तेवढा पुण्याचा साठा जमा करावा व परस्त्रीयांना आईबहिणी प्रमाणे मान सन्मान दिला पाहिजे इत्यादी अनेक गोष्टी शिवचरीत्रातुन शिकाव्यात हे उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाला मुधोजी महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.रणधीर मोरे, प्रा.सुनिल गोडसे , श्री. देशमुख सर, शेख मॅडम, पोतदार मॅडम, रा.से.यो.चे कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा .रमेश गवळी, प्रा.सौ.निलम देशमुख, प्रा.मदन पाडवी, प्रा. योगिता मठपती, प्रा.संतोष कोकरे , प्रा. व्ही.पी.मोरे ,प्रा. पवार , प्रा. पाटील , प्रा. काटे , प्रा.पाडवी, प्रा . गायकवाड इ., रा.से.योजनेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.