फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या संकल्पनेतून मॅन ऑफ द मंथ हा पुरस्कार दर महिन्यात वितरित केला जातो. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचारी तथा पोलीस पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. माहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांच्या पुरस्कार विजेत्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बेस्ट पोलीस आॅफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी,मोहन हांगे-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विलास यादव-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,मोहन काळे-पोलीस हवालदार तसेच
बेस्ट पोलीस पाटील आॅफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भाडळी गावचे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर, सुरवडी गावचे पोलीस पाटील संतोष पवार, विडणी गावच्या पोलीस पाटील-शितल नेरकर, सरडे गावचे पोलीस पाटील-मनोज मोरे वडले गावच्या पोलीस पाटील-स्वाती घनवट यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, धन्यकुमार गोडसे यांनी सुरू केलेल्या मॅन ऑफ द मंथ पुरस्कारांमुळे पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते व एक चांगली निर्भेळ स्पर्धा निर्माण होऊन सर्वजण अत्यंत कार्य कुशलतेने कामगिरी बजावताना दिसत आहेत असे मनोगत यावेळी फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांनी व्यक्त केले.