फलटण टुडे ( गोखळी प्रतिनिधी):
सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानासह बुद्धिमत्ता आणि कौशल्या विकास वाढिसाठी वाव मिळावा या हेतूने हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खाऊ गल्लीसह रांगोळी स्पर्धा,हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांमधून खाऊ गल्लीमध्ये ओली भेळ, पाणीपुरी, इडली, सांबर ,वडापाव, खारे शेंगदाणा, फुटाणे, सह पाले भाज्या, लिंबू, कोथिंबीर, केळी यांचे स्टॉल लावले होतें. गोखळी गावचे उपसरपंच सागर गावडे पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले,सह उपशिक्षक, तसेच विद्यार्थीनी भेट देऊन या समारंभाला रंगत आणली.भोसले मॅडम, गावडे मॅडम,माने मॅडम रांगोळी परीक्षण केले. यावेळी पोलीस पाटील विकास शिंदे, जिल्हा परिषद शाळा गोखळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पै दिपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जगताप, अमोल हरिहर व पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी या खाऊ गल्लीच्या आनंदाचा लाभ घेतला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसाठी” बेटी बचाव, बेटी पढाव ” या विषय देण्यात आले,रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. हळदी कुंकू समारंभासाठी गावातील महिलांचा मोठ्या प्रतिसाद लाभला. विद्यालयातील सुप्रिया धायगुडे मॅडम शुभांगी बोंद्रे मॅडम स्वाती भगत मॅडम यांनी महिलांचे स्वागत केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य एच.डी .अभंग ,मोहन ननावरे सर, विकास घोरपडे सर, किरण पवार सर यांनी परिश्रम घेतले