रुचेश जयवंशी
फलटण टुडे (सातारा )दि.23 :
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान संबंधित विभागानी समन्वयाने जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
26 जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर शहरी, ग्रामीण शासकीय रुग्णालये शाळा, महाविद्यालयांमध्ये कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा द्यावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, स्थानिक महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळे यांच्या सभा द्याव्यात तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळाही घ्यावी.
बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाबरोबर आरोग्य मेळावे घ्यावे. समाज कल्याण विभागाने आश्रमशाळा, वसतिगृह येथे मार्गदर्शक सुचनेनुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशाही सचूना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केल्या.