फलटण टुडे ( सातारा )दि.23 :
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी दु. 2.00 वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथे राष्ट्रीय मतदार दिन समांरभ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी उपजिल्हाधिकार व उपाजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे, 262 सातारा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला, सहा. मतदार नोंदणी अधिकारी राजेश जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.