फलटण टुडे वृत्तसेवा :-
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची संयमी उदयसिंह रणवरे राज्यात सतवी तर तालुक्यात पहिली आली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जूलै २०२२ मध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधे
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सातार जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची संयमी उदयसिंह रणवरे शहरी विभागातून राज्यात सातवी आली आहे. संयमीला ३०० पैकी २८४ गुण मिळाले आहेत. दरम्यान, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत मुधोजी हायस्कूलचे एकूण १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
या यशाबद्द्ल संयमी रणवरे चे व तीला मार्गदर्शन करणारे शिक्षक दत्तात्रय मुळीक, गणेश कचरे , विकास रोमन , सागर भोईटे , संतोष तोडकर , चेतन बोबडे , व्हि एस रसाळ , टि व्ही शिंदे यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती व विद्यमान विधान परिषद सदस्य मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी अरविंद निकम , प्राचार्य बी. एम . गंगवणे , उपप्राचार्य ए वाय ननवरे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , शिक्षक वृंद यांनीअभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे