दूध उत्पादक यांना योग्य व उच्च हमी भाव : मनोज तुपे

मौजे माळवाडी येथील चिलिंग प्लांट चे उदघाटन करताना मनोज तुपे व इतर मान्यवर


फलटण टुडे (बारामती ) :  
दूध उत्पादक यांच्या सहकार्यामुळे डेअरी व्यवसायाचे चे अस्तित्व टिकवून आहे त्यामुळे दूध उत्पादक यांना आर्थिक सुबत्ता यावी व त्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रियल डेअरी व फॉर्च्यून डेअरी चे चेअरमन मनोज तुपे यांनी केले.
फलटण तालुक्यातील मौजे माळवाडी (सांगवी) या ठिकाणी पन्नास हजार लिटर क्षमतेच्या दूध संकलन व शीतकरण प्रकल्प चीलिंग प्लांटच्या उदघाटन व दुध डेअरी पदाधिकारी व दुध उत्पादकांच्या मेळाव्याप्रसंगी मनोज तुपे मार्गदर्शन करीत होते.
या प्रसंगी शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे, पंढरी मिल्कचे संचालक तानाजी सालविठ्ठल, गणेश पाटील , तुंगत चे नवनाथ रणदिवे, महालक्ष्मी मिल्क अध्यक्ष विजय कदम, साईराज मिल्क चेअरमन रावसाहेब वाघ, रियल डेअरी चे प्रेसिडेंट प्रशांत अपारजीत,
सरव्यवस्थापक अमोल राऊत, एच आर मॅनेजर सुशांत शिर्के व फलटण बारामती परिसरातील दूध उत्पादक उपस्तीत होते.
दिलेल्या शब्द पाळत दुधासाठी वेळे मध्ये उच्च हमी भाव देत दूध उत्पादक यांच्या सहकार्यामुळे अनेक नामवंत कंपन्यांचे उत्पादन करू शकलो व कोरोनाच्या काळात सुद्धा दिलेल्या सेवे मुळे रियल डेअरी अनेक पुरस्कारास पात्र ठरली दुध उत्पादक, कंपनीचे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मुळे गुणवत्ता व दर्जात्मक उत्पादन देशामधील अनेक ब्रँड ला देऊ शकतो ही अभिमानस्पद बाब असल्याचे मनोज तुपे यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दूध उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सुशांत शिर्के यांनी मानले 

 —
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!