पर्यावरण संरक्षण व संवर्धन करून मानवी जीवन विकसीत करावे : मा. डॉ. सुजित जाधव*

शिबिराच्या प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम सादरकर्ते  व्याखाते  मा. डॉ. सुजित जाधव,
फलटण टुडे (फलटण) दि२१ : –
    फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २० जानेवारी २०२३ रोजी शिबिराच्या प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याखाते म्हणून    मा. डॉ. सुजित जाधव, विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र, एस. बी. आर. महाविद्यालय यांनी पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल तर तो मानव त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला मात्र, परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून वा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्याप्रति नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही, त्यामुळे आज पर्यावरण वाचवा यासारखी वाक्ये कानी पडत आहेत. पर्यावरणाविषयी खुप काही जागृती केल्यावरसुद्धा मानवाच्या वर्तनात किंचितसुद्धा परिवर्तन झाले नाही, बदल झाला नाही ही फारच काळजी करण्यासारखी आणि भविष्यात चिंतेची बाब आहे असे प्रतिपादन रा.से.यो. चे स्वयसेवक व उपस्थित जावली गावातील युवक, ग्रामस्थ यांना उद्देशून केले. या व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. डॉ. टी. पी. शिंदे, विभाग प्रमुख, भुगोल, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी
सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो  त्यामुळेच त्या कुटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे असे वाटत नाही काय? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असावे. पर्यावरणाचा र्‍हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढीस लागली की त्यांची घरे वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुटुंब नियोजनासारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. लोकसंख्येला आळा घातल्याशिवाय आपली कोणतीही प्रगती शक्य नाही व आपला देश महासत्ता होणार नाही. पर्यावरणातून आपणास हवा, पाणी आणि नैसर्गिक समृद्धी मिळते, ज्याद्वारे आपण चांगले जीवन व्यतित करू शकतो. अन्नाशिवाय मनुष्य एखादा दिवस जगू शकतो परंतु, पाण्यावाचून तो जगू शकत नाही मात्र, मानवाने पाण्याचा उपसा करत त्याचा गैरवापर केल्यामुळे आज देशात पाण्याची समस्या खूपच गंभीर बनत चालली आहे त्यामुळे मानवाने पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन रा.से.यो. चे स्वयसेवक व उपस्थित जावली गावातील युवक, ग्रामस्थ यांना उद्देशून केले.
     सदरील राष्ट्रिय सेवा योजना पुरस्कृत श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमाला मा. सौ. ज्ञानेश्वरी मकर, सरपंच, ग्रामपंचायत, जावली, श्री.रामदास ठोंबरे, उपसरपंच, जावली, ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जावलीचे चेअरमन व पत्रकार श्री. राजकुमार गोफणे, डॉ. वी. पी. गायकवाड, प्रा.एस पी. तरटे, प्रा. एम.एस बिचुकले,कार्यक्रम अधिकारी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण, प्रा. टी.एन शेंडगे, कार्यक्रम अधिकारी, अभियांत्रिकी महाविद्यलय, फलटण, जावली गावातील युवक, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी, बहुसंख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!