विद्यार्थांना कमवा व शिका याविषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यावेळी उपस्थित इतर मान्यवर
फलटण टुडे ( फलटण ) दि.16 :
मुधोजी हायस्कूल व ज्यु काॅलेज फलटण या ठिकाणी डाॅ. बी.आर .आंबेडकर आय आय टी संस्था व मुधोजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ” कमवा व शिका आणि तंत्रज्ञानाच्या नवीन वाटा ” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला व मा. उपप्राचार्य एम के फडतरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य गंगवणे सर यांनी वाणिज्य व कला शाखेच्या विदयार्थांना भविष्यात खुप संधी उपलब्ध आहेत फक्त ती शोधावी लागतात या बद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर कांबळे मॅडम यांनी संस्थे विषयी माहिती दिली.तसेच प्रमुख मार्गदर्शक डाॅ.दिपक पाटेकर सर यांनी संस्थेचे कार्य व शिक्षण शिकताना सुध्दा कमवता येते या बदल त्यांनी संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण केले.
यावेळी शेखर कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या दरम्यान सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद व आय आय टी संस्थेची टिम ने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन पवार एस. एम. यांनी केले तर आभार रणवरे अमोल यांनी मानले .