फलटण येथे दरवर्षी प्रमाणे होणारे राज्यस्तरीय धर्मवीर ६वे साहित्य संमेलन दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ ला होत असुन संमेलनाचे अध्यक्षपदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक।महाराष्ट्र बुक आँफ रेकाँर्डिश लेखक जगन्नाथ शिंदे
यांची निवड करण्यात आली.
अँग्रो न्युजचे अध्यक्ष प्रकाश सस्ते, कार्याध्यक्ष प्रा.नितीन नाळे,सदस्य मा.ज्ञानेश्वर देशमुख यांचे कमिटीने ही
निवड जाहीर केली व जगन्नाथ शिंदे
यांना निवड पत्र देऊन पेढे भरविले.
मा.ना.रामराजे निंबाळकर यांचे
पंच्याहत्तराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन हे संमेलन भव्य दिव्य करण्याचे ठरले आहे.
हे संमेलन दि.27फेब्रुवारी रोजी फलटण येथे होणार असून ग्रंथ दिंडी संमेलन उद्घाटन परिसंवाद ,कथाकथन ,कवी संमेलन ,पुरस्कार वितरण अशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली.
साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यांनी आता पर्य़त त्यानी सोळशी येथील राज्यस्तरीय संमेलन, फलटण येथिल
राज्यस्तरीय नाट्य संमेलन, माण दुष्काळी राज्यस्तरीय साहित्य संमेलन
व अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली आहेत.
त्यांच्या निवडीचे साहित्य क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.