फलटण टुडे ( सातारा )दि. 19 : –
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते-किसवे यांच्या उपस्थिती संपन्न झाली.
या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये एसटी महामंडळ आवारातील स्वच्छता, नगर परिषद हद्दीतील विविध अडचणी, ग्राहकांच्या तक्रार निवारणाबाबत ॲप तयार करणे, सातारा शहर बसवाहतूक व सिग्नल यंत्रणा, पार्किंग नियंत्रणाबाबत, वीज पुरवठ्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.