फलटण टुडे (सातारा ) दि. 18: दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे व 15 ऑगस्ट रोजी तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले, खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर, कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले आढळतात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होते. तरी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखावा.
तसेच खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज विद्यार्थी, युवक मंडळे, कीडा मंडळे,स्वयंसेवी संस्था यांच्या मतदीने गोळा करुन त्याची ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरुदीनुसार विल्हेवाट लावावी, असे तहसिलदार (सर्वसाधारण) यांनी कळविले आहे.