फलटण एजुकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर चे वार्षिक स्नेहसंमेलन,पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला
या कार्यक्रमासाठी माननीय श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांनी व मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर चेअरमन मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रमणलाल दोशी हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय सौ नूतन अजित सिंह शिंदे या होत्या. सर्व उपस्थितांचे स्वागत व अहवाल वाचन माननीय मुख्याध्यापक श्री रुपेश शिंदे सर यांनी केले.यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भरारी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रशालेत राबवले जाणारे उपक्रम विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास हे खरोखरच कौतुकास्पद आहे प्रशालेचा आलेख असाच उंचावत राहो तसेच गुणवंत विद्यार्थी यांच्या समवेत सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या उज्वल यशास शुभेच्छा व इंटरनेटच्या युगात मुलातील सुप्त गुणांना प्रेरणा दिल्या बद्दल प्रशालेचे अभिनंदन अध्ययन अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे मुधोजी प्राथमिक शाळा खरोखरच अभिनंदनास पात्र आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
तसेच प्रशालेत अध्ययन अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे शालेय व सहशालेय उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे . प्रशालेत संगणक प्रशिक्षण , कला , क्रीडा, विज्ञान, संगीत ,नृत्य ,नाट्य, परिसर ओळख, बाल सुरक्षितता ,माता प्रबोधन यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी माननीय श्री अरविंद सखाराम निकम साहेब ,अधीक्षक माननीय श्री श्रीकांत बाबुराव फडतरे साहेब, श्री घोरपडे साहेब, श्री राऊत श्री डी.वाय.मोहिते साहेब, श्री कुंडलिक नाळे साहेब , निमंत्रित सदस्य श्रीमती निर्मला सतीश रणवरे संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते .
प्रशालेच्या उपशिक्षिका
सौ.सोनाली सुर्यवंशी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री रामचंद्र शिंदे सर यांनी आभार व्यक्त केले.