फलटण टुडे(बारामती ):
कंपनी ही आपले कुटूंब आहे समजून काम करणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य व कर्मचारी हा सहकारी आहे, ही कंपनी प्रशासनाची भावना कंपनी च्या प्रगतीस गरजेची असते हा विचार भारतीय कामगार सेनेने रुजवला त्यामुळे व बारामती मध्ये कामगार सेना टिकवणे खरे धारिष्ट्य असल्याचे
प्रतिपादन भारतीय कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस व शिवसेना उपनेते “डॉ रघुनाथ कुचिक” यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथील सुयश ऑटो कंपनी मधील भारतीय कामगार सेनेच्या रोप्यमोहत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “डॉ.कुचिक” बोलत होते.
या प्रसंगी सुयश ऑटो युनिट संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, सरचिटणीस पोपट घुले, खजिनदार सोमनाथ भोंग व कंपनीचे चेअरमन अरुण कांचन, प्रकल्प प्रमुख मनोज इंगळे, उपव्यवस्थापक महेंद्र निगडे,वरिष्ठ अभियंता शिरीष राऊत व भारतीय कामगार सेना सहचिटणीस शुभम दिघे, कार्यकारणी सदस्य अनिल जगताप, कार्यकारणी सदस्य तेजस गरसुंड, व पतसंस्था संचालक नंदकुमार गवारे, संजय पवार आदी मान्यवर उपस्तीत होते.
सतत २५ वर्ष एक झेंडा, एक संघटना, एक नेता
यामुळे ” कुचिक व भारत जाधव यांचे” कुशल नेतृत्व व निष्ठावान कामगार यांचे दर्शन आज पाहण्यास मिळाले.
कोरोनाच्या परिस्थिती चा कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने प्रशासन व संघटना यांनी एकत्रित उत्तम काम करावे व सुयश ऑटो युनिट चे कार्य कौतुकास्पद असल्याचे डॉ. रघुनाथ कुचिक यांनी सांगितले.
हौसिंग सोसायटी, पतसंस्था व युनिट च्या माध्यमातून कर्मचाऱ्या च्या व कुटूंबियाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविल्याने व ते सर्व यशस्वी केल्याने बारामती तालुक्यातील आदर्श कामगार संघटन म्हणून सुयश ऑटो चा नावलौकिक आहे हेच वर्धापन दिनाचे खास गिफ्ट असल्याचे युनिट संस्थापक अध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले.
या प्रसंगी सुरेश पवार यांचा सेवा निवृत्ती निमित्त व पतसंस्था संचालक यांचा सत्कार आणि दिनदर्शिका प्रकाशन व कामगाराच्या कुटूंबियाचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले आभार सोमनाथ भोंग यांनी मानले
————————-