डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे

 

 सातारा दि.17 ( फलखा टुडे ): –
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालय यांनी डिसेंबर 2022 अखेरचे ई आर-1 तिमाही विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले.

ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!