सातारा, दि.16 (फलटण टुडे ): –
क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी 30 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.
सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.