सातारा, दि. 16 ( फलटण टुडे ): –
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता महाडीबीटी पोर्टलवरुन नविन (Fresh) व नुतनिकरण (Renewal) च्या अर्जांची ऑनलाईन स्विकृती दि.22/09/2022 पासून सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज व राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या प्रति वर्ष अर्ज संख्या लक्षात घेता. तसेच सदर योजनाबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शन सुचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जांवर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करुन सदरअर्ज विहीत कालावधीमध्ये निकाली काढण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजीच्या ऑनलाईन आढवा बैठकीमध्ये प्रशांत नारनवरे आयुक्त, समाज कल्याण महराष्ट्र राज्य पुणे. यांनी सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी परिक्षा फी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती नितीन उबाळे, सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली.