डॉ.श्रीकांत देशपांडे यांचे स्वागत करताना रविंद्र बेडकिहाळ. समवेत डॉ.शिवाजीराव जगताप, सौ.नीता शिंंदे, दिनकर गांगल, महादेवराव गुंजवटे, अमर शेंडे.
फलटण, दि.15 (फलटण टुडे ): –
महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्था फलटण तालुक्याच्या पत्रकारिता, साहित्य व संस्कृती क्षेत्रात करीत असलेले काम समाजाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
राज्य निवडणूक कार्यालय, थिंक डॉट कॉम व महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित फलटण तालुका संस्कृती महोत्सवासाठी देशपांडे यांचे आज फलटण येथे आगमन झाले. त्यावेळी येथील महाराजा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये त्यांचे स्वागत प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सौ.नीता शिंदे, थिंक डॉट कॉम व्हिजन फौंडेशनचे अध्यक्ष दिनकर गांगल, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी केले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, प्रमुख कार्यवाह अमर शेंडे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त भारद्वाज बेडकिहाळ, राज्य निवडणूक कार्यालच्या प्रमुख अधिकारी पल्लवी जाधव, थिंक डॉट कॉमचे पूर्णवेळ कार्यकर्ते नीतेश शिंदे उपस्थित होते.
मकर संक्रांतीदिवशीच या प्रमुख मान्यवरांचे फलटण शहरात आगमन झाल्याचे औचित्य साधत महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेतर्फे सर्वांना तिळगूळ वाटप करीत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.