सातारा दि. 13 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : – अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 16 जानेवारी 2023 रोजी स्वीप (SVEEP) स्टॉलचे उद्घाटन व फलटण तालूका सांस्कृतिक महोत्सवांतर्गत युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी दिली.