बारामती ( फलटण टुडे ): –
बारामती येथील लेखिका ,कवीयत्री सौ अर्चना प्रकाश सातव यांना या वर्षीचा राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव पुरस्कार गुरुवार दि.१३ जानेवरी रोजी राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक (ता वेल्हे) येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
425 वा ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पाल बुद्रूक येथे मावळा जवान संघटनेच्या वतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक मावळा जवान संघटनेचे संस्थापक इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे व मावळा परिवार यांनी केले होते.
या प्रसंगी
कर्नल सुरेश पाटील,भोर उपविभागिय अधिकारी राजेंद्र कचरे पोलिस अधिकारी भाऊसाहेब पाटील जेष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल, तहसिलदार शिवाजी शिंदे, शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर, प्रदिप ढुके अध्यक्ष मावळा जवान संघटना बारामती नितिन माडंगे, रमेश मरळ देशमुख, दत्तात्रय हरिहर, अर्चना ढुके दिपाली जाधव,पुनम माडंगे, आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचे आत्मचरित्र, मी लढणारच ,यशस्वी व्हा, आदी पुस्तकाचे लेखन व सामाजिक बदलावर कविता चे लेखन व त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन अर्चना सातव यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे.