फलटण ( फलटण टुडे ) : –
ट्रिक्स अभ्यासीकेत प्रा.अजित मोरे (प्राचार्य फलटण लॉ कॉलेज )धीरज सस्ते (राज्य उत्पादन शुल्क अधिकारी)अमोल भालके (समाज कल्याण अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला. प्रा.अमित मोरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान आणि विचार आत्मसात करणे आवश्यक असून त्यातूनच सुजाण युवक निर्माण होऊ शकेल.
तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होताना विवेकानंदांच्या सहनशील ,संयम ,छंद ,आदरयुक्त स्वभाव आणि जिज्ञासू व अभ्यासू हे गुण युवकांना माणूस म्हणून देखील कसे महान बनवतील हे सांगितले.स्वामी विवेकानंद यांचे मोजके अनुभव शेअर करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच धीरज सस्ते सर यांनी अभ्यास कसा असावा ते पेपर ला सामोरे जातपर्यंत चे अचूक बारकावे सांगितले.
तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दल माहिती दिली तसेच अमोल भालके सर यांनी अभ्यासासोबत विद्यर्थ्यांनी नैतिक आचरण देखील उत्तम ठेवावे . आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि सातत्य ठेऊन नियोजनबद्ध अभ्यास करावा आशा अनेक गोष्टी मार्गदर्शनातून सांगितल्या .
याकार्यक्रमास श्रद्धा कुलट ( STI ) रुपाली कदम (STI) श्री महामुनी सर ,नितेश शिंदे (राज्य उत्पादनशुल्क अधिकारी )सागर सोनवले (RTI कार्यकर्ते) असे अनेक मान्यवर उपस्थित होते .अभयसीकेच्या वतीने प्रमुख पाहुण्याना सन्मानपत्र व विवेकानंद चरित्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालिका राणी बिनवडे यांनी केले.