सातारा,दि.11 ( फलटण टुडे ) : सातारा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध असून सध्या कृषी सेवा केंद्रात 46177 मे. टन खतसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे.
खतांमध्ये युरिया साठा 13340 मे.टन, डिएपी-4827 मे.टन, एमओपी-1016 मे. टन, संयुक्त खते-19419 मे.टन व सुपर फॉस्टेज-7531 मे.टन कृषी सेवा केंद्रात विक्रीस उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कृषीक विभागाने कृषीक ॲपच्या माध्यमातून खत उपलब्धततेची माहिती दररोज अपडे करण्यात येते. स्मार्टफोन कृषीक ॲप डाऊनलोड करुन खत उपलब्धता या आयकॉनवर क्लीक करावे. आपल्या तालुक्याची निवड केल्यानंतर जिल्हा व तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी यादी उपलब्ध आहे. नजिकच्या कृषी केंद्रावर क्लिक केल्यास त्या विक्री केंद्रास उपलब्ध खतसाठ्याची माहिती पाहता येईल.
शेतकऱ्यांनी एखाद्या विशिष्ट खतालाच प्राधान्य न देता पर्यायी खते वापरण्याकडे आपला कल वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माती परिक्षण करुन जमिनीचा पोत सुधारेल व पिकांना आवश्यक घटक मिळतील अशीच खते वापरणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा मागणी आवश्यकप्रमाणे रास्त दराने करावा, असेही आवाहन श्री. माईनकर यांनी केले आहे.