बारामती (फलटण टुडे ): –
बारामती कला क्रीडा फाउंडेशन च्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृह एमआयडीसी बारामती या ठिकाणी मोफत कराटे प्रशिक्षण वर्ग चा शुभारंभ करण्यात आला
या प्रसंगी
बारामती कला क्रीडा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप लोंढे व ज्योतीचंद
भाईचंद सराफ च्या संचालिका सौ पल्लवी शितल शहा,वसतिगृह अधीक्षक सौ रुपाली खारतोडे व कराटे प्रशिक्षक दीपक मोरे आदी मान्यवर उपस्तीत होते .
ज्योतीचंद भाईचंद सराफ यांच्या वतीने मुलींना मोफत कराटे गणवेश वाटप करण्यात आला.
स्वसंरक्षणासाठी मुलींना कराटे हा खेळ गरजेचा असल्याचे प्रतिपादन डॉ. दिलीप लोंढे यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जोपासत ज्योतिचंद भाईचंद सराफ नेहमीच मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वसंरक्षणासाठी अग्रेसर असेल असे पल्लवी शहा यांनी सांगितले आभार प्रदर्शन कराटे प्रशिक्षक दीपक मोरे यांनी मांनले