सातारा दि. 10 ( फलटण टुडे ): –
मकर संक्रांती व भोगी हा सण दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून कृषी सहायक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनविण्यात येणाऱ्या उपपदार्थ यांची माहिती देणार आहेत. मरक संक्रांती व भोगी हा सण पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.