गोखळी ( फलटण टुडे प्रतिनिधी) : –
मौजे खटकेवस्ती ता. फलटण येथे खटकेवस्ती सरपंच विकासरत्न बापूराव गावडे खटकेवस्ती येथील गोरगरीब जनेतेची गरज ओळखून जनतेच्या सेवेसाठी शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
खटकेवस्ती येथे गरीब सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मरण पावली तर अंत्यविधी साठी नेहण्यासाठी चार कि.मीटर जावे लागत असे ही गरज ओळखून गरीब सर्वसामान्य कुटुंबासाठी शववाहिका सरपंच बापूराव गावडे यांनी उपलब्ध करून दिली. तसेच १५ वित्त आयोगातून वार्ड क्रमांक १ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड. वार्ड क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व भूमिगत गटर यांचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच यावेळी शववाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक तानाजी बापू गावडे पाटील.श्रीराम सहकारी साखर कारखाना मा व्हाईस चेअरमन बजरंग खटके. खटकेवस्ती सरपंच रघुनाथ ढोबळे. सरपंच काका खटके. उपसरपंच तानाजी सस्ते. पाणीपुरवठा चेअरमन संजय हनुमंत गावडे. ग्रामपंचायत सदस्य ज्योतीराम दडस. आबा कापले,शिवाजी शिंदे,महादेव खटके,रामभाऊ पाटोळे, विपुल खटके, आकाश खटके ,सत्यजित खटके, किशोर घाडगे,अमोल बागाव ,सागर चव्हाण.श, दत्तात्रय गायकवाड, धर्मा घाडगे,फिरोज इनामदार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी या सर्व मान्यवराचे स्वागत सरपंच बापुराव गावडे यांनी केले व आभार ग्रामसेवक देवकर अण्णा यांनी मानले.