अंतरविभागीय हॉकी स्पर्धीत तृतीय क्रमांक मिळवीलेल्या मुधोजी महाविद्याल मुलांच्या संघासोबत क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील पाटील
फलटण ( फलटण टुडे ): –
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग, वारणानगर येथे सन 2022-23 रोजी झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय हॉकी स्पर्धीचे आयोजन केले गेले होते.
या स्पर्धी अतिशय रोमांचक झाल्या पडल्या,या अंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी मुधोजी महाविद्यालय, मुलांच्या हॉकी संघाने सहभााग घेतला होता. या स्पपर्धेत मुधोजी महाविद्यालयच्या मुलांच्या हॉकी संघाने या स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला.
या विजयाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा.सभापती व विधान परिषद विद्यमान सदस्य मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी अरविंद निकम , अधिक्षक श्रीकांत फडतरे
प्रभारी प्राचार्य कदम सर व प्राध्यापक यांनी यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .