क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे व इतर मान्यवर
फलटण दि. 3 (फलटण टुडे ) : –
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती व बालीका दिनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी भार्गवी बडवे या इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीं ने सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा केली होती . तसेच यावेळी बडवे भार्गवी ,
आर्या अब्दागिरे , गितांजली भोसले , नाळे पूर्वी , भोसले अनुष्का , श्रावणी बोबडे , प्रज्ञा सूळ यांनी सावित्रीमाई यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी विचार मांडले .
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी
समस्त स्त्रिायांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! करणासाठी आज आपण या ठिकानी जमलो आहोत असे सांगितले .
यावेळी अध्यक्षीय भाषणात मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे म्हणाले की ३ जानेवारी म्हणजे देशाची पहिली महिला शिक्षक, महिला विद्यार्थीनी, महिला समाजसेविका असे विविध पातळीवर योगदान दिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीमाई केवळ पहिल्या महिला शिक्षका किंवा पहिल्या पहिल्या महिला शाळेच्या पहिल्या मुख्यध्यापिका आणि संस्थापिका देखील होत्या. विद्यार्थीनी नसुन त्या देशातील म सावित्रींचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव नामक छोट्या गावी झाला होता. अवघ्या ९ वर्षांच्या सावित्रीचा विवाह तेरा वर्षांच्या ज्योतीराव फुलेंशी लावून देण्यात आला. वयाच्या ९व्या वर्षा पर्यत सावित्रईंनी एकही वर्ग शिक्षण घेतलं नव्हतं. लोकांची टिका टिपण्णी ऐकत सावित्रींनी स्वत शिक्षण घेतल. एवढचं नाही तर अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी देशातील पहिली महिला शाळा उघडून मुलींना शिक्षण देण्यास सुरवात केली. आज याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती. तरी देशाच्या या धाडसी लेकीन अनंत अडचणीतुन मात करुन स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका समाजसेविकाव महिलांना सबलीकरणासाठी त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे वंदनीय व्यक्तीमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीमाई आहेत .
तसेच यावेळी पर्यवेक्षक शिवाजीराव काळे म्हणाले स्त्रीशिक्षणाच्या अग्रणी,ब्रिटिश राजवटीत महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण सर्वांनी त्यांच्या महान कार्यास आज जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन! करावे असे आवाहन केले .
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर , तसेच सावित्रीच्या लेकी लतीका एच अनपट, हेमा ए जाधव , एस. एन सस्ते , रसाळ व्हि एस , तृप्ती व्हि शिंदे , ए. ए . निंबाळकर , आगवणे एस एस , घोलप एस एस , बुचडे एल यु , कदम एस बी उपस्थित होत्या तसेच उपशिक्षक बापूराव सूर्यवंशी , दत्तात्रय मुळीक, अमोल नाळे , अमोल सपाटे, संजय गोफणे इत्यादी शिक्षकवृंद कार्यक्रमास उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्तावीक लतिका अनपट यांनी केले तर आभार तृप्ती शिंदे यांनी मानले