फलटण ( फलटण टुडे ) : –
फलटण एज्युकेशन सोसायटीचे
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण
येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी प्रशालेतील मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेशभूषा केलेली होती त्याचबरोबर अतिशय उत्स्फूर्तपणे सावित्रीबाई फुले यांच्या लेकींनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उघडून दाखवला काही मुलींनी सावित्रीबाईंचा पाळणा म्हणून दाखवला तर काहींनी एकांकिका सादर केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रुपेश शिंदे सर , सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी सौ अस्मिता गायकवाड मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.