छत्रपती शाहक्रीडा संकूल सातार येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लीश मिडीयम स्कूल (एस एस सी ) विभाग ‘ जाधववाडी येथे शिकतअसलेल्या पलक राजपुरोहित हया विदयार्थीनीने सातारा येथे दि. २८ व२९ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या विभागीय गोळाफेक व थाळीफेक या मैदानी स्पर्धेत द्वितीय, कमांक मिळवून बालेवाडी येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
पलक राजपुरोहित या यशस्वी खेळाडूचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे मा. सभापती तथा विद्यमान विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निबांळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निबांळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम प्रशालेच्या प्राचार्या संध्या फाळके व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पलक ला सुुहास कदम व कुमार पवार यांचे मार्गदर्शन लाभले.