सातारा दि. 27 (फलटण टुडे ) :
विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभावर आधारित सरळसेवा भरती संवर्गाकरीता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा 30 जानेवारी 2023 रोजी मुंबई परीक्षा केंद्रावर होणार आहे, असे दक्षता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे धोरण व संशोधन सह सचिव यांनी कळविले आहे.
नगर विकास विभाग, संवर्ग नगर रचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा गट-अ परीक्षेची वेळ सकाळी 9 ते 10, विधी व न्याय विभाग संवर्ग सहायक विधी सल्लगार-नि-अवर सचिव गट- अ सकाळी 11.30 ते 12.30. नगर विकास विभाग संवर्ग विधी अधिकारी महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा गट-अ दुपारी 2.30 ते 3.30. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग औषधनिर्माता महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब दुपारी 2.30 ते 3.30. नगर विकास विभाग सहायक संचालक, नगररचना, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा गट-अ दुपारी 5 ते सायं.6. सार्वजनिक आरोग्य विभाग सांख्यिकी अधिकारी सामान्य राज्यसेवा गट-ब दुपारी 5 ते सायं.6.